आसमंती पाहता
पक्षी हा उडे भक्तीचा
देहात साठे हा योग
त्या माऊलीच्या शक्तीचा
जन्म उभा शिनला तुझ्या
या चरणाशी लोळला
कळसाकडे पाहता
कळस डोले भाभड्या मनीचा
तू उभा क्षण भरी
माझे चित्त तुझ्या दारी
विझता दीप.. तपाने
चेतविला भेटीचा वेग
सावळ्या सुखाची आस
'मज' लागली
परमात्म्याची
आत्म्यास ओळख जाहली
माझी पंढरीची माय
माझी पंढरीची माय
No comments:
Post a Comment