Tuesday, October 20, 2020

बाप



तुम्हाला माहित आहे बाप काय असतो माझा बाप माझा खरा आधार होता..
असतो सर्वांचाच असतो पण त्याचा माझ्यावर खूप जीव होता असणारच कारण.... माझ्या बापाला एकटाच होतो.... बापणेच आईचे छत्र दिले.. वाढवले.. शिकवले.. लहानाचे मोठे केले.. जे हवे होते ते आणून दिले.. माझा आनंद जपला.. माझी ख़ुशी कशात आहे ती जपली..
अन स्वतः मात्र दिवसभर राब राब राबून पोटाला थोडीशी भाकर खायचा असा माझा बाप....
शाळेला गेलो तरं लगेच धावत यायचा.. आर राम्या पोरा जेवलास का लेका तुझ्यासाठी डब्बा आणलाया बघ घे खा थोडं.. आर मन तरी कसं लागलं अभ्यासात....स्वतःची चिंता मात्र करायचा नाही.. दिवाळी दसरा आला की राम्या आर पोरा तुला आपण नवीन कपडे आणूया चल दिवाळी दसरा हाय नवं.. जुनी कापड घालून फिरशील का बाळा जुनी बरी न्हाय दिसणार..
मी म्हटलं बाबा अहो तुम्ही फाटलेले कपडे घालता अन मला नवीन कपडे घायचे म्हणता.. नाही हे शक्य नाही मला.. अगोदर तुम्ही नवीन कपडे घ्या.. माझ्या बापाचे डोळे भरून आलें अन त्यानं मला गच्च छातीला धरल आणि धरून रडू लागला.. आणि आम्ही दुसऱ्याच दिवशी बाबांना कपडे आणायला गेलो.. कपडे घेतले बाबाला खूप आनंद झाला.. आणि रस्त्यानी येत होतो. आणि माझ्या बाबाचा अपघात झाला अन माझा बाप त्यातच मेला अन.. मला ऐकट सोडून गेला.. ह्या जगात नवीन कपड्यांनी सजलेला माझा बाप रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यात पडला होता.. जणू माझ्या बापाची शेवटची दिवाळी झाली होती हुंदके देऊन तोही रडत होता अन छाती फोडून मी रडत होतो.. पण माझा बाप काय परत नाही आला लोक हो.. माझ्या बापानं माझ्यासाठी खूप केलं अन माझा बाप जेंव्हा मला सोडून गेला तेंव्हा मला माझ्या बापाची किंमत कळली की..
खरा बाप काय असतो आपल्यासाठी किती खचता खातो..
त्यामुळे स्वतःच्या आई वडिलांना खूप जपा.. त्यांची काळजी घ्या.. त्यांना कधी तुच्छ.. कमी लेखू नका कारण आई बाप आपले पहिले गुरु आहेत.. देव आहेत.. म्हणूनच म्हटले आहे..
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी आणि
बाप घरात नसेल तर घराला घरपण नाही..
आहे सदा जगण्यामध्ये लाचारी..
आहे सदा जगण्यामध्ये लाचारी..


No comments:

Post a Comment

Followers