Tuesday, October 20, 2020

अथांग प्रेम

 किती पाहावे तुला कमीच पडत सार....

डोळ्यात साठवून तुला कमीच पडत सार....

असं हे तुझं बघणं वेड बनवून टाकत.....

वेड लागलंय मला हे नकळत सांगून जात....
असं पाहत नको जाऊ मला सारखं....
एकेदिवशी मी वेडा होईल....
आधीच सर्व हरवून बसलोय....
अजून जास्तच खुळा होईल....
तुझं हे लाजून बघणं आणि....
लाजून त्यावर हे हसणं.... घायाळ
करत मला.. अन प्रश्न मनात पाडायला भाग पाडतो तुला....
सुंदर तुझं हे बघणं त्याहून सुंदर तुझं दिसणं....
अगं वेड लावतय मला अगं वेड लाव तय मला....
किती पहावे तुला कमीच पडत सारं....
अथांग प्रेम करूनही तुला कमीच पडत सार....
लेखिका - सोनम पवळे (जाधव)
@All Copyrights Reserved




No comments:

Post a Comment

Followers